येथील प्रफुल्ल पाटील या तरुणाने जळगाव येथील तरुणीसोबत बऱ्हाणपूर येथे नोटरी पद्धतीने प्रेमविवाह केला. नंतर दोघे सावखेडा येथे घरी आले होते. मात्र, याचा राग तरुणीच्या नातेवाईकांना होता. त्यांनी १९ मे रोजी सावखेडा गाठून संबंधित प्रफुल्ल त्याचे आई-वडील व नातेवाईकांना मारहाण केली. पत्नीचे अपहरण केले ,अशी फिर्याद प्रफुल्ल रमेश पाटील (वय २६) यांनी सावदा पोलीस स्टेशन येथे दिली.
पोलीस सूत्रानुसार, शुक्रवार दुपारी १.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीची पत्नी आणि कुटुंबातील आई-वडील, भाऊ, आजी-आजोबा हे सावखेडा येथे घरीच होते. यावेळी सुमारे २० ते ४० जणांनी सिनेस्टाईल गावामध्ये प्रवेश केला. अचानक घरात प्रवेश करून हातातील लोखंडी रॉडने घरातील साहित्याची नासधूस, तोडफोड केली.
आई-वडिलांना मारहाण करताना फिर्यादीचा भाऊ प्रज्वलने टोळक्याचा प्रतिकार केला. पण, त्यांनी प्रज्वलच्या तोंडावर व डाव्या हाताच्या पंजाला दुखापत केली. ओढाताणीत फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केले. नंतर काही लोकांनी फिर्यादी व त्याच्या आजीला लोखंडी रॉडने अंगावर मारहाण केली.
फिर्यादीने प्रेमविवाह केलेल्या तरुणीला बळजबरीने घरातून ओढून नेत सोबत आणलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जळगावकडे बसवून नेत अपहरण केले. याप्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे
0 Comments