प्रेम म्हणजे आजच्या पिढीसाठी खेळ झाला आहे. आकर्षणानंतर क्षणिक सुखासाठी तरूण किंवा तरूणी नको ते करून बसतात. याचा परिणाम त्यानंतर त्यांनाच नाहीतर कुटूंबालाही भोगावा लागतो. मात्र काहीवेळा एकतर्फी प्रेमातून तरूण त्यांना हव्या असलेल्या प्रेयसीसाठी प्रयत्न करतात. संबंधित तरूणीच्या मनात काय आहे? तिलाही आपल्याविषयी त्याचा भावना आहेत का? याचा विचार न करत तिला मिळवण्यासाठी जबरदस्ती करतात. परंतू वारंवार नकार दिल्याने काहीजण उलट्या डोक्याचे नको ते करतात. अशाच प्रकारचं प्रकरण समोर आलं आहे.
नेमकं काय झालं?
हमीरपूर जिल्ह्यातील बसेला या गावामध्ये पूजा नावाची 22 वर्षीय तरूणी राहत होती. त्याच गावामध्ये दीपक नावाचा तरूण राहत होता. दीपकचं पूजावर एकतर्फी प्रेम होतं. अनेकवेळ त्याने तिला विचारलं होतं. मात्र तिने वारंवार नकार दिला होता. नंतर त्याने अनेकवेळा विनयभंग केला. या त्राासाला कंटाळून तिने आपलं कॉलेज बंद केलं
2 मे ला पूजाचे कुटुंबीय एका लग्नाला गेले होते. त्यावेळी घरात फक्त पूजा आणि तिची आजी आणि आई हजर होत्या. याबाबत दीपकला माहिती मिळाली होती. दीपकने याचाच फायदा घेतला आणि घरात घुसला आणि टेरेसवर झोपलेल्या पूजाजवळ गेला. जबरदस्तीने पूजाचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागला. त्यावेळी तिने आणि आजीने आरडाओरडा करून विरोध केला. रागाच्या भरात त्याने पूजावर गोळी झाडली. गोळीबार मारल्यानंतर तिथून तो आरोपी पसार झाला.
0 Comments