याबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य गजानन आढाव असं हत्या झालेल्या मुलाचं असून आदित्य हा वारंवार वडील गजानन आढाव व आई संगिताबाई आढाव यांच्याशी दारूच्या नशेत वाद घालत होता आणि वडिलांना मारहाण करत होता. काल ही आदित्यने दारूच्या नशेत येऊन घरात आई आणि वडिलांना त्रास देण्यास सुरवात केली. यावेळी त्याने वडिलांना आणि आईला मारहाण केली
त्याच्या या दरोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून वडिलांनी पत्नी संगिताबाई आढाव यांना घराबाहेर बसण्यास सांगुन मयत मुलाचा गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर दिशाभूल करण्यासाठी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला.
या प्रकरणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वडिल गजानन आढाव यांची अधिक चौकशी केली. यावेळी आपणच आदित्यचा गळा आवळून खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची कबुली दिली. त्यानंतर संगिताबाई आढाव यांच्या फिर्यादीवरुन पती गजानन आढाव यांच्य विरुद्ध मुलाचा खुन केल्या प्रकरणी पारध पोलिस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणी अधिक तपास पोलीस करत असून गजानन आढाव यांना पोलिसांनी अटक केली आहे.
0 Comments