महाराष्ट्र हादरला! १४ वर्षीय मुलगी कुख्यात गुंडासोबत फसली, फुस लावून ३ शहरांमध्ये फिरवलं अन्...

महाराष्ट्रामध्ये महिला अत्याच्याराच्या घटना वाढत असताना आता अल्पवयीन मुलीही कुठेच सुरक्षित नाहीत हेच वारंवार समोर आलं आहे. या सगळ्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इथे एका कुख्यात गुंडाने अवघ्या १४ वर्षीय मुलीसोबत असं काही केलं की वाचून तुम्ही हादराल.
२२ वर्षीय कुख्यात गुन्हेगाराने परिसरातच राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुलीला फुस लावून अपहरण केले. अल्पवयीन मुलीला ३ शहरात नेत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलीस मागे लागल्याचे कळताच आरोपीने मुलीला सोडून पळ काढला. ज्या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यातील तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे
रोहित घुले वय २२ रा. पुंडलिक नगर परिसरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुंडलिकगर परिसरातच राहणाऱ्या ओळखीच्या असलेल्या १४ वर्षाच्या मुलीचा तो अनेक दिवसांपासून पाठलाग करत होता.
काही दिवसांपूर्वी त्याने अचानक तिला फूस लावून निर्मनुष्य परिसरात नेले. मुलीला वेगवेगळ्या भुलथापा देऊन वाहनातून तिचे अपहरण केले. आरोपी रोहितने मुलीला घेऊन जालना गाठले. तिथे थांबल्यानंतर त्याने ठिकाण बदलले. तो तिला घेऊन जालनानंतर शिर्डी आणि अन्य शहरात फिरत राहिला. या ठिकाणी आरोपी रोहित याने अल्पवयीन मुलीला ३ शहरात नेत अत्याचार केला.
मुलीला सोडून काढला पळ....
दरम्यान, अचानक १४ वर्षीय मुलगी घरातून निघून गेल्यामुळे नातेवाईकांनी तिचा परिसरामध्ये शोध घेतला. मित्र-मैत्रिणींशी विचारपूस केली. पण तिचा अद्याप शोध लागला नाही. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होताच पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. यावेळी पोलीस मागे लागल्याचे रोहितला कळताच त्याने मुलीला सोडून दिले आणि त्या ठिकाणाहून पळ काढला.
आरोपीला अटक....
मुलीचे वडीलदेखील खूनाच्या गुन्ह्यात सध्या हर्सुल कारागृहात आहे. दरम्यान, फूस लावून पळून नेत अत्याचार करून सोडून दिलेल्या पीडित मुलीने शहर गाठले. यावेळी घडलेला सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. हे संपूर्ण प्रकार ऐकून मुलीच्या आईला धक्काच बसला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याला ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेघा माळी करीत आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e