नोटबंदीच्या निर्णयाबाबत फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, "कुणी काळा पैसा..."

भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकली. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा समर्थक या निर्णयाचं कौतुक करत आहेत, तर विरोधक या निर्णयाने नोटबंधीचा निर्णय फसल्याचं सिद्ध झाल्याची टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते नागपुरात बोलत होते
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"दोन हजार रुपयांची नोट ही सर्कुलेशन मधून बाहेर काढण्याचा निर्णय झाला आहे. त्याला काही आता इनलिगल ठरवलेलं नाही. ऑक्टोबरपर्यंत ही नोट सर्कुलेशनमधून बाहेर काढायची आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत या नोटा बदला येतील", असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

"ज्याच्याकडे कायदेशीर नोटा असतील, ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल. अशा कुणालाही चिंता करण्याची गरज नाही. कुणी काळा पैसा जर जमा करून ठेवला असेल, तर शेवटी त्यांना हे सांगावंच लागणार की त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून?", असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दोन हजार रुपये आणि दुसऱ्या कोणताही नोटा बदल्यानंतर त्याचा सर्वात मोठा फायदा असा झाला की, जी फेक करन्सी आपल्याकडे पूश करण्याचा प्रयत्न, आयआयसारख्या संघटनाचा माध्यमातून होतो".

"तो प्रयत्न यामधून पूर्णपणे उधळला जातो. या निर्णयामुळे फेक करन्सी पूश करण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यावर आळा येईल, दुसरीकडे ज्यांनी नोटा जमा करून ठेवल्या असतील, त्यांना हे सांगावं लागेल या नोटा कुठून आल्या म्हणून..", असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e