गंभीर म्हणजे पीडित तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला आहे. त्यामुळे पीडित तरुणीची बलात्कार करून हत्या झाल्याचा संशय आहे
वसतिगृहातील सुरक्षा रक्षकानेच हे कृत्य केल्याचा आरोप आहे.आरोपीने या कृत्यानंतर चर्नी रोड स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.
या संतप्त घटनेप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मरीन लाईन पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेतली.
तसेच पीडितेच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. यानंतर अजित पवारांनी माध्यमांना माहिती दिली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…आरोपीला वसतिगृहातील अनेक मुली काही ना काही कामानिमित्त फोन करायच्या – अजित पवारकदाचित आरोपीने वसतिगृहातील मुलींचा विश्वास संपादन केला असेल – अजित पवार
फोनमधील नंबरवरून आरोपीचं वेगवेगळ्या मुलींशी संभाषण झाल्याचं दिसत आहे. मात्र, काय संभाषण झालं आहे हे अद्याप समजलेलं नाही – अजित पवार
मी पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे करण्यास सांगितलं आहे – अजित पवारआई-वडिलांनाही शंका आहे की, आमच्या मुलीला एकटीला चौथ्या मजल्यावर का ठेवलं? – अजित पवाररोज वडिलांना फोन करणाऱ्या या मुलीने ८ जून रोजी पुन्हा गावाकडे जाण्यासाठी तिकीट बूक केलं होतं – अजित पवारयाबाबत पोलिसांनी वसतिगृहाच्या रेक्टरांना विविध प्रश्न विचारले आहेत
सीसीटीव्हीत कोण बाहेर पडलं हेही तपासण्यात आलं – अजित पवार पहाटे चार-पाच वाजल्याच्या दरम्यान ज्याने दुष्कृत्य केलं तो व्यक्ती वसतिगृहातून बाहेर पडला
यानंतर रेल्वे रुळावर जाऊन त्याने आत्महत्या केली. त्यामुळे तोही पुरावा राहिलेला नाही त्यामुळे यात आणखी काही शक्यता आहेत का हेही तपासलं जात आहे
0 Comments