कोचिंग क्लासमधील मुलींवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप; शिक्षिकेसह ८ जणांवर गुन्हा, ४ अटकेत

अहमदनगर राहुरी येथे शिक्षिकेकडून कोचिंग क्लासला येणाऱ्या अल्पवयीन मुलींवर धर्मांतरासाठी दबाव टाकला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी काही मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षिकेसह चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. यापूर्वी श्रीरामपूरमध्ये घडलेल्या घटनांमध्ये डबल मोक्का लावण्यात आला असून लव जिहादच्या बाबतीत जिल्हा पोलीस प्रमुखांना सक्त सूचना दिल्या आहेत.
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना घडतील तिथल्या पोलीस अधिकाऱ्यावर देखील कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस तत्परतेने कारवाई करताय मात्र, अशा घटना घडत असतील तर नागरिकांनी स्वतः पुढे आले पाहिजे, असे अवाहन विखे पाटलांनी केले आहे. तसेच उंबरे येथे घडलेल्या प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे.
या प्रकरणातील कोचिंग क्लासच्या शिक्षिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा आधिक तपास सुरू असून आणखी कुणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनजंय जाधव यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e