डाॅ. गावित म्हणाल्या 350 बोगस लाभार्थी या योजनेत आढळून आले आहेत. या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तर मूळ लाभार्थींना आता पंतप्रधान घरकुल योजना देण्यासाठी केंद्र सरकारकडे देखील मागणी करणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात असा भ्रष्टाचार होणार नाही याकडे देखील लक्ष दिलं जाणार आहे असेही डाॅ. गावित यांनी स्पष्ट केले. यानंतर कोणीही बोगस लाभार्थी आढळल्यास त्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा खासदार डाॅ. हिना गावित यांनी चुकीचे काम करणा-यांना दिला आहे.
0 Comments