पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की खळी येथील गोरक्षनाथ किसन कांगणे हे गुरुवार दि. २७ जुलै २०२३ रोजी दुपारी १ वाजल्याच्या सुमारास गट नं. ४४७ या आपल्या क्षेत्रातील जनावरांच्या गोठ्याजवळ काम करत असताना बाबासाहेब किसन कांगणे, दिलीप बाबासाहेब कांगणे, शोभा दिलीप कांगणे, शैला बाबासाहेब कांगणे, सुभाष मुरलीधर कांगणे,
मैना सुभाष कांगणे, जालिंदर सुभाष कांगणे, पोपट कारभारी कांगणे, सागर पोपट कांगणे, रामदास रघुनाथ कांगणे, प्रकाश विठ्ठल कांगणे, तेजस ज्ञानदेव कांगणे, रमेश राजाराम घुगे, अलकाबाई रमेश घुगे (रा. कांगणवाडी, खळी) हे सर्व जण आले व सुभाष मुरलीधर कांगणे व बाबासाहेब किसन कांगणे यांनी गट नं ४४७ क्षेत्रातील असणाऱ्या विहीरीत हिस्सा मागितला
हे क्षेत्र फिर्यादीचे असल्याने या विहिरीत हिस्सा मिळणार नाही, असे म्हटल्याचा राग आल्याने गोरक्षनाथ कांगणे यांच्यासह पत्नी ताराबाई, मुलगा विशाल व चैतन्य यांना शिवीगाळ व दमबाजी करत मारहाण केले. गोरक्षनाथ कांगणे, पत्नी ताराबाई, मुलगा विशाल व चैतन्य हे जखमी झाल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
0 Comments