पुणे होतंय अंमली पदार्थ तस्करांचं हब, ६० लाखांचा साठा जप्त; पुणे पोलिसांची कारवाई

पुण्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पुण्यातील तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहेत. अशामध्ये पुणे पोलिसांच्या  अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल ६० लाख रुपयांचे अफू जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी २४ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसर भागात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मोहनलाल मेगाराम बिष्णोई असे या अटक करण्यात आलेल्या २४ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. राजस्थानवरुन हा तरुण पुण्यातील हडपसर परिसरात अफू विक्री करण्यासाठी आला होता. या तरुणाकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल ६० लाखांचे अफू जप्त केले आहेत
पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात एक तरुण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. या तरुणाकडे असलेल्या पिशवीची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये अफू असल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी मोहनलालला अटक केली. मोहनलालकडून ३ किलो २९ ग्रॅम वजनाचे अफू जप्त करण्यात आले आहे. याची किंमत ६० लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून मोहनलालची चौकशी सुरु आहे. त्याने हे अफू कोणाच्या सांगण्यावरुन हडपसरमध्ये आणले होते याचा तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e