सोनगीर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पहाटे तीन वाजता पोलिसांना सरवड फाटा ते लामकानी दरम्यान नंदाणे गावाजवळ एक सोनेरी रंगाची महिंद्रा झायलो कंपनीचे वाहन (क्र. एम.एच. 15 ई-7312) संशयास्पद वाटले. त्यामुळे पोहेका दराडे व चालक पोकॉ सोनवणे, कमलेश महाले यांनी नंदाणे गावाजवळ वाहन चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन आणखी वेगात चालवून पळू लागला. त्यामुळे सोनगीर पोलिसांनी देखील पाठलाग सुरू केला. त्यानंतर झायलो वाहनावरील चालकाने थोड्या अंतरावर वाहन थांबवून अंधारात पळून गेला.
वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंश जातीचे लहान-मोठे असे नऊ जनावरे दाटीवाटीने कोंबून क्रुरतेने, आखुड दोरीने बांधलेले दिसले. कत्तलीच्या उद्देशाने त्यांची वाहतूक केली जात होती. 27 हजारांची नऊ लहान, मोठे गावराण गोवंशीय जनावरे व पाच लाखांचे वाहन असा एकुण पाच लाख 27 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दराडे हे करीत आहेत.
0 Comments