मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील एका शाळेत ज्युनिअर केजीमध्ये ३ वर्ष ८ महिने वयाची तिची मुलगी जून २०२३ पासून शिकते. मागील वीस दिवसांपासून तिला त्रास होत असल्याने आईने तिला गारखेडा भागातील एका रुग्णालयात दाखविले. तेव्हा तिच्या गुप्तांगाजवळ जखम असल्याचे निदर्शनास आले.
विचारपूस केली तेव्हा तिने सांगितले, की अमोल नावाचा व्यक्ती तिच्या गुप्तांगामध्ये पेन्सिल फिरवतो तर वर्गशिक्षिका तिला मारहाण करते आणि अमोलसोबत एका रूममध्ये लॉक करून ठेवते. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ३० वर्षीय शिक्षिका आणि अमोलविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराच्या कलमासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक मेघा माळी या करत आहेत.
0 Comments