कानपूरच्या गुजेनीची रहिवासी असलेली 12 वीची विद्यार्थीनी 18 जुलैच्या तारखेला महाविद्यालयाच्या गेट जवळून बेपत्ता झाली होती. मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या काही दिवसानंतर पोलिसांना मुलगी एका निर्जन रस्त्यावर सापडली आहे. पोलिसांनी या तरूणीला पोलीस ठाण्यात नेऊन घटनेचा तपास सुरु केला होता. तसेच तिच्या कुटुंबियांना देखील या घटनेची माहिती दिली होती
महाविद्यालयाच्या गेट जवळून अपहरण
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, ''तुझ्या भावाचा अपघात झाला आहे'', असे सांगून माझ्य़ा मामाचा मुलगा कल्लू मला महाविदयालयाच्या गेट बाहेरून घेऊन गेला. मामाच्या मुलासोबत सोनू आणि राम सलजी हे त्याचे मित्र देखील होते. हे तिघेही मला एका घरात घेऊन गेले आणि त्यांनी चार दिवस माझ्यावर अत्याचार केल्याचे पीडित मुलीने सांगितले.
पीडित मुलीने पुढे सांगितले की, चार दिवसानंतर मला मध्यरात्री एका निर्जन रस्त्यावर सोडून देण्य़ात आले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मध्यरात्री मला पोलिस स्टेशनमध्ये आणले. मात्र पोलिसांनी या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली नाही. दुसऱ्या दिवशी कुटुंबियांना पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर मला मेडिकलसाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती पीडित मुलीने दिली.या प्रकरणात पोलिसांनी अद्यापतरी एकाच आरोपीला अटक केली आहे. तर इतर आरोपी अजूनही मोकाटच आहेत. इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांच्या या कारवाईवर कुटुंब संतुष्ट नसल्याचीही माहिती आहे.
0 Comments