यादरम्यान त्यांच्या टोळीचे काहीजण काही अंतरावरून भवतालच्या हालचाल लक्ष ठेवून होते. यादरम्यान घरात घुसलेल्या तोट्या एसीबीच्या पथकाने यादव यांच्या घरातून तब्बल ३४ लाख ७५ हजाराचा ऐवज एकत्र करून लुटला होता. दरम्यान एसीबीची धाड असल्याचेच समजून यादव हे देखील दोन दिवस शांत होते. मात्र त्यानंतर त्यांना संशय आल्याने तिसऱ्या दिवशी त्यांनी रबाळे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यावरून गुन्हा दाखल होताच उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी निरीक्षक भागुजी औटी, सहायक निरीक्षक राकेश पगारे, दीपक खरात, उपनिरीक्षक दयानंद वणवे, हवालदार प्रसाद वायंगणकर, दर्शन कटके, टिकेकर आदींचे पथक केले होते. त्यांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासून संशयित कारची माहिती मिळवली होती.
त्याद्वारे पुणे, कल्याण, मुंबई परिसरातून शिताफीने अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. दीपक कविटकर (४७), नरेश मिश्रा (५२), रुपेश नाईक (४२), सिद्धेश नाईक (३२), मुस्तफा करंकाळी (४०), विजय बारात (४३), देवेंद्र चाळके (३२), किशोर जाधव (४७), जुल्फिकार शेख (४३), वसीम मुकादम (३९) व आयुब खान (५०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.अशा प्रकारे लुटमारीचा त्यांचा पहिलाच गुन्हा असून काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांना पाहिजे असलेल्या व्यक्तींनी तीन वेगवेगळ्या टोळीच्या व्यक्तींना एकत्र करून यादव यांच्या घरावर धाड टाकून लुटीचा बनाव रचला होता. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार व लुटीचा २५ लाखाचा ऐवज हस्तगत केल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.
एकमेकांनाही अनोळखी अटक केलेले सर्वजण तीन वेगवेगळ्या गटातले आहेत. गुन्हा करताना ते घरात घुसले त्यावेळी ते एकमेकांना देखील अनोळखी होते. पाहिजे असलेल्या व्यक्तींनी हा कट रचुन त्यांना गुन्ह्यात सहभागी करून घेतले होते.
टीप कोट्यवधींची, हाती लाखो. यादव यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची अपसंपदा असल्याची टीप काही व्यक्तींना मिळाली होती. यावरून त्यांनी स्पेशल २६ प्रमाणे छापा टाकून लुटीचा बनाव रचला होता. प्रत्यक्षात मात्र ३४ लाख हाती लागल्याने त्यांचीही निराशा झाली होती.
0 Comments