बोरविहीर-नरडाणा रेल्वे; भूसंपादनास हेक्टरी 7 लाखांचा दर! नाराज शेतकरीवर्ग संघर्षाच्या पवित्र्यात

बोरविहीर-धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाच्या भूसंपादनांतर्गत धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील काही गावांचे शेतीक्षेत्र बाधित होणार आहे. यात मोबादल्यापोटी हेक्टरी सरासरी सहा ते सात लाख रुपयांचा दर दिला जाणार आहे. हा मोबदला अधिसूचनेच्या तारखेपासून व्याजासह चौपटीत दिला जाणार आहे. मात्र, या दराविषयी पीडित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. समाधानकारक दर मिळण्यासाठी ते बोरविहीर-नरडाणा रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून संघर्षाच्या पवित्र्यात आहेत
मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा एक भाग म्हणून बोरविहीर-नरडाणा रेल्वेकडे पाहिले जाते. मध्य रेल्वे मंत्रालयाकडील २२ फेब्रुवारी २०२२ च्या अधिसूचनेनुसार बोरविहीर ते नरडाणा या ५०.५६ किलोमीटरच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. केंद्रीय बजेटमध्ये या ५० किलोमीटर रेल्वेमार्गासाठी शंभर कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गासाठी धुळे तालुक्यातील १९, तर शिंदखेडा तालुक्यातील पाच गावांमध्ये क्षेत्र मोजणीची प्रक्रिया हाती घेतली गेली. यात योग्य मोबदल्यासाठी ड्रोन सर्व्हेद्वारे परीक्षण, जमिनीच्या सॅटेलाइट इमेजेस घेण्यात आल्या आहेत.भूसंपादनाची प्रक्रियाधुळे तालुक्यातील गरताड, दापुरी, कुंडाणे, दापुरा, कापडणे, धमाणे, नरव्हाळ, न्याहळोद, निमखेडी, पिंपरी, बाळापूर-फागणे, बिलाडी, वडजाई, लोणकुटे, सरवड, सावळदे, सोनगीर, वरखेडे, सौंदाणे आदी क्षेत्रात सरकारी ४.३४५ हेक्टर व खासगी ३०१.३८ हेक्टर जमिनीचे संपादन होत आहे. तसेच शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी बुद्रुक, वाघाडी खुर्द, कलमाडी, मेलाणे व माळीच येथील खासगी शेतजमिनीचे क्षेत्र संपादित करण्यात येत आहे. यंत्रणेकडून दापुरा, दापुरी, धनूर, लोणकुटे, सरवड, सोनगीर या गावांचा निवाडा झाला आहे. त्यातील बाधित शेतकऱ्यांना निर्धारित दरानुसार ३१ ऑगस्टपासून मोबदला रकमेचे वाटप होणार आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्‍नधुळे व शिंदखेडा तालुक्यात हेक्टरी सरासरी सहा ते सात लाखांचा दर दिला जाणार आहे. चौपटीत अधिसूचनेपासूनच्या व्याजासह मोबदल्याची रक्कम दिली जाणार आहे. हा दर समाधानकारक नाही, तर खूपच कमी आहे.या दराने रेल्वेसाठी जमिनीचा काही तुकडा देणाऱ्या किंवा भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यास अन्य दुसऱ्या ठिकाणी जमीन खरेदी करता येईल का? रेल्वे विकास प्रकल्पाला विरोध न करता शेतकरी खुशीने चरितार्थाचे साधन असलेली शेतजमीन देत आहे.मात्र, त्यास समाधानकारक दर मिळावा, अशी अपेक्षा आहे. तसा दर मिळण्यासाठी बोरविहीर-नरडाणा रेल्वे संघर्ष समितीची स्थापना केली आहे. याद्वारे अपेक्षित मोबदला मिळण्यासाठी संघर्ष करू, कायदेशीर लढाई करू, असा निर्धार पीडित शेतकऱ्यांनी बोलून दाखविला.रेल्वे धावण्याचे २०२५पर्यंतचे उद्दिष्टधुळे हे रेल्वेच्या सेंट्रल लाइनवर, तर नरडाणा वेस्टर्न लाइनवर येते. या दोघांना जोडणारा दुवा म्हणजेच बोरविहीर ते नरडाणा हा रेल्वेमार्ग आहे. तो झाल्यास गुजरात आणि दक्षिण भारतालाही धुळे जिल्हा जोडला जाईल.या मार्गावर बोरविहीर, कृषी महाविद्यालयाजवळ न्यू धुळे, निमखेडी, कापडणे, सोनगीर, नरडाणा येथे स्टेशन असेल. रेल्वे प्रशासनाकडूनही ही रेल्वे २०२५ पर्यंत धावावी, असे नियोजन आहे."जिल्हा परिषदेच्या बोरविहीर गटातील बोरविहीर, नरव्हाळ, गरताड, वडजाई, सौंदाणे, सावळदे या गावातून सर्वाधिक जमीन रेल्वे प्रकल्पात जात आहे. शेतकरी जमीन देतो म्हणून त्याला अवाढव्य रकमेचा मोबदला द्यावा, अशी मागणी नाही. याप्रश्‍नी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ज्या प्रकारे फळबागांसह कृषी मूल्यांकन व जमिनीसाठी दर दिला, त्याप्रमाणेच रेल्वे प्रकल्पांतर्गत भूसंपादन, फळबागांसाठी मोबदल्याचा दर द्यावा, अशी माफक मागणी आहे. त्यासाठी फळबाग व फळझाडांची सॅटेलाइट इमेज घ्यावी. या मागणीची पूर्तता न झाल्यास बोरविहीर गटातील जमिनी देण्यास नाखूश असू."-अरुण पाटील, जिल्हा परिषद सदस्य, बोरविहीर गट

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e