पाण्याचे नमुने तपासणीसाठी लाच घेताना अटक; ACBची कारवाई

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना एकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २९) कारवाई केली.
वैभव दिगंबर सादिगले (४८, रा. वक्रतुंड अपार्टमेंट, तिडके कॉलनी, नाशिक. मूळ रा. टिळेकर नगर, कोंडा, पुणे) असे लाचखोर वरिष्ठ अणुजीव सहाय्यकाचे नाव आहे.तक्रारदार हे त्यांच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली संस्था तसेच इतर तीन संस्थांचा केटरिंग व्यवसाय करतात. त्या चारही संस्थांच्या केटरिंग व्यवसायाकरीता जे पाणी वापरले जाते, त्या पाण्याचे एकूण चार नमुने तपासणीसाठी त्यांनी जिल्हा प्रयोग शाळेत दिले होते. सदरील पाण्याचे अहवाल सकारात्मक देण्यासाठी लाचखोर सादिगले याने शासकीय शुल्काव्यतिरिक्त प्रत्येक पाणी नमुन्याचे ५०० रुपये याप्रमाणे चार नमुन्यांचे एकूण दोन हजार लाचेची गेल्या शुक्रवारी (ता. २६) मागणी केली होती
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी (ता. २९) सापळा रचला.तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम पंचासमथ घेतल्यानंतर दबा धरून असलेल्या पथकाने लाचखोर सादिगले यास अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, प्रविण महाजन, नितीन कराड, प्रमोद चव्हाणके यांनी बजावली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e