विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे.आतापर्यत केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र,यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे.महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण दीड लाख होते ते आता प्रती कुटुंब प्रती वर्ष ५ लाख रूपये करण्यात आले आहे. दोन्ही योजनांचे एकच कार्ड वाटप लवकरच सुरू होणार असून योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे.उपचारांसाठी आजारात वाढयापुढे दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये ३२८ उपचारांची वाढ केली आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतही १४७ उपचारांची वाढ करून ही संख्या आता १३५६ एवढी करण्यात आली आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची उपचार संख्या ३६० ने वाढवण्यात आली आहे. मात्र १३५६ पैकी ११९ उपचार केवळ शासकीय रुग्णालयांमध्येच मिळणार आहेत. मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण अडीच लाखावरून साडेचार लाख रूपये करण्यात आली आहे. यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी रुग्णालय त्या योजनेतिकृत करण्यात येणार आहेत.अपघातावर होणार उपचारसकारात्मक बदल करत स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरून १८४ अशी वाढविण्यात आली आहे. योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येऊन उपचाराच्या खर्चही ३० हजार रुपयांवरून प्रती रुग्ण प्रती अपघात १ लाख रूपये अशी वाढ करण्यात आली आहे.असे झाले बदल...प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत मागास,अंत्योदय व इतर कुटुंबीय लाभार्थी पात्र ठरतील तर महात्मा फुले आरोग्य योजनेत पिवळी,अन्नपूर्णा,केसरी शिधापत्रिकाधारकांसह शुभ्र शिधापत्रिकाधारक शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिधापत्रिका नसलेले कुटुंब देखील लाभ घेऊ शकणार आहे
याशिवाय आश्रम शाळेतील विद्यार्थी, अनाथ, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींचाही प्राधान्याने विचार होणार आहे. लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व फोटो ओळख आवश्यक असून नसेल तर अधिवास दाखलाही चालणार आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध समित्या देखील कार्यान्वित करण्यात आल्या आहे. शिवाय आज जाहीर झालेल्या परिपत्रकात उपचारास पात्र आजारांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे.७२ हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारजिल्हाभरातील लाखो नागरिकांना सध्या ७२ रुग्णालयात उपचार मिळणार आहेत.यामध्ये नाशिक शहरात ३१,निफाडला ८,देवळालीत २,इगतपुरी ५,सिन्नर २,नांदगाव १, येवला ३, चांदवड १, दिंडोरी ३, पेठ १, कळवण १, सटाणा २, व मालेगाव येथील १२ रुग्णालयांचा समावेश आहे.मेंदू, हृदय,कान,नाक,घसा,कर्करोग,थेरेपी,त्वचा,जळीत,नेत्ररोग,स्रीरोग,अस्थिरोग,पोटाचे आजार,बालरोग, न्युरो,जळीत,प्लास्टिक सर्जरी अशा विविध प्रमुख आजारांवर उपचार होऊ शकणार आहेत." सर्व शिधापत्रिका धारकांना पाच लाखापर्यंतच्या मोफत उपचारात शासन निर्णय आज जाहीर झाला आहे.आवश्यक काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असून सदरील तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर लाभार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे लाभ देण्याची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल. अनेक गरजू कुटुंबीयांना या बदलाचा लाभ होऊ शकेल." -डॉ.पंकज दाभाडे,जिल्हा समन्वयक,महात्मा फुले जन आरोग्य योजना"या योजनांचा आतापर्यंत सर्वच गरजू व गरिबांना लाभ मिळाला आहे.शासनाने सकारात्मक बदल करत योजनाच्या लाभार्थ्यांचे,आजारांचे व रकमेचेही विस्तारीकरण केल्याने सर्व प्रकारचे नागरिक उपचार घेऊ शकणार असल्याने हा निर्णय स्वागतार्ह आहे." - डॉ.श्रीकांत काकड,साईसिद्धी हॉस्पिटल,येवला
0 Comments