शिरपूर तालुक्यातील आर.सी पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे या शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता बालवाडी ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये सर्व वर्ग मिळून 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रत्येक वर्गातून प्रथम तीन क्रमांक काढून कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खोंडे होते तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी निलेश सुरेश कुंभार, रमेश इशी,प्रशांत चैत्राम शिरसाठ,संजय बापू वाडीले,बापू दशरथ वाडीले, येमुबाई शामराव शिरसाठ, ताराबाई किसन भोई,मुक्ताबाई विलास वाघ हे पालक उपस्थित होते. सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर प्रत्येक वर्गातील स्पर्धेमधील विजेते विद्यार्थी यांनी आपली मनोगत उपस्थित पाहुण्यांसमोर व्यक्त केली त्यात इयत्ता बालवाडी बालवाडी-कल्याणी कुंभार, गौरवी पटेल, भूमिका कोळी, हिमांशी इशी, सोनाक्षी इशी इयत्ता पहिली - गायत्री धनगर, अक्षरा इशी, इयत्ता दुसरी-ओम सोनार,मृणाल कोळी, मनोरमा शिरसाठ, मनस्वी धनगर, प्राची धनगर,गायत्री राजपूत इयत्ता तिसरी - अल्फिया खाटीक, वैष्णवी चौधरी, प्रणवी शिरसाठ, हर्षल धनगर, तेजस वाडीले, वैभव शिरसाठ,इयत्ता चौथी- पलक इशी, प्रणाली पारधी,प्रांजल वाडीले,हितेश्वरी धनगर,कृतिका धनगर, कुणाल पटेल या विद्यार्थ्यां पैकी काहींनी मराठी व काहींनी इंग्रजी या भाषांचा वापर करून मनोगते व्यक्त केली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खोंडे यांनी जयंती व पुण्यतिथी साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तसेच लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे या दोन्ही थोर नेत्यांचा जीवन कार्याचा परिचय करून दिला. या कार्यक्रमात सुंदर भाषण करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा बुके देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उप शिक्षक संजय पटेल, उपशिक्षिका बबीता काटोळे, बालवाडी शिक्षिका सुनंदा सोनार, शिक्षकेतर कर्मचारी भाईदास पावरा, अभिजीत इशी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments