पिंपरी- चिंचवडमधील उच्चभ्रू वसाहत असलेल्या निगडीमध्ये प्रसिद्ध हॉटेलच्या महिला- पुरुष (कॉमन) शौचालयात मोबाइलने चित्रीकरण केल्याचं प्रकरण समोर आल आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सजग नागरिकामुळे हे गंभीर प्रकरण समोर आल आहे. पोलीस हे प्रकरण पैसे घेऊन दडपण्याचा प्रयत्न करत होते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
निगडी परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणचे अनेक हॉटेल्स हे विविध खाद्यपदार्थासाठी नावाजलेले आहेत. अशाच एका हॉटेलमध्ये एक गंभीर प्रकार घडला असून हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल आहे. निगडी मधील प्रसिद्ध हॉटेल च्या महिला -पुरुष (कॉमन) शौचालयामध्ये वेटरने मोबाईल ठेवून चित्रीकरण केल्याचं गंभीर प्रकरण पुढे आल आहे. ग्राहक कॉमन शौचालयात शौचास गेल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू असलेला मोबाईल त्या ठिकाणी आढळला आहे. मोबाईल त्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलीय. हे प्रकरण पैसे घेऊन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. अशी माहिती सूत्रांनी दिलीय. परंतु, अखेर नागरिकांच्या दबावानंतर संबंधित वेटरवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.
0 Comments