कल्याण : इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. या आरोपीला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. रवींद्र रातंबे असे आरोपीचे नाव आहे. अवघ्या ४८ तासात या मुलीचा शोध घेत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या
संबंधित अल्पवयीन मुलगी सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान कुटुंबासह प्रवास करत होती. याच दरम्यान अचानक मुलगी गायब झाली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने या मुलीचा शोध सुरू केला. स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासले असता ही मुलगी आढळून आली. पुढील तांत्रिक तपास व खबर्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे सदर मुलगी आरोपीसह कर्जत येथील एका गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मुलगी पालकांच्या स्वाधीन
कल्याण गुन्हे रेल्वे शाखेच्या पथकाने तत्काळ या गावात धडक देत, आरोपी रवींद्र रातांबे याला बेड्या ठोकल्या. सदर मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. रवींद्र याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून या पीडित मुलीची मैत्री वाढवली होती. प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यानीच तिला पळवून नेल्याचे उघड झाले आहे.
0 Comments