शिरपूर शहरात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन व अटकेची मागणी

 प्रतिनिधी :- महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने शिरपूर शहरातील सावता परिषद, समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ, सावता प्रतिष्ठान, माळी महासंघाच्या वतीने माथेफिरू मनोहर कुलकर्णी तथा संभाजी भिडें विरोधात दि ३ ऑगस्ट रोजी शिरपूर तहसील कार्यालयासमोर संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात तालुक्यातील राजकिय, सामाजिक नेत्यांसह शहरातील संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दिनांक ३ ऑगस्ट गुरवार रोजी सकाळी ११ वाजता आंदोलकांनी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना निवेदन देत भिडेंवर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनात म्हटले की, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विरोधात अपमानास्पद भाष्य वापरुन जातीय सलोख्यात तेढ निर्माण करीत आहेत.त्यांच्या बद्दल अपशब्द वापरणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. मनोहर कुलकर्णी याने अत्यंत निंदा नालस्ती विधान करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करावी. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करण्याचा त्याने यापुर्वीही प्रयत्न केला आहे.
संभाजी कुलकर्णी हे प्रत्येकवेळी अनेक महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून दोन समाजात पेढ निर्माण करत आहे. अनेक वेळा त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत, संभाजी भिडे हे प्रत्येकवेळी अनेक महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून तरुणांची माथेफिरून दिशाभूल करत आहे. अनेक वर्षांपासून भिडे अशी चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. जगात ख्याती असणाऱ्या व स्री शिक्षणाची द्वारे उघडणाऱ्या महात्मा फुले यांच्या बद्दल अशी वक्तव्ये करणाऱ्या मनोहर भिडें विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून समाजात तेढ निर्माण करून दंगलीचे बीज पेरणाऱ्या भिडेला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वरील संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e