ठिय्या:पैसे घ्या पण शाळेला मान्यता द्या, असे म्हणत धुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवली नोटांची गड्डी

शहरातील आर. आर. परदेशी प्राथमिक शाळा व बाल मंदिराला मान्यता देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होते आहे. त्यामुळे संस्थाचालक प्रभा परदेशी यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तसेच शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्या टेबलवर भेट पैसे ठेवले. पैसे घ्या पण मान्यता अशी मागणी त्यांनी केली. यामुळे कार्यालयातील कर्मचारी अवाक झाले. या घटनेचा सर्व शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, केंद्रप्रमुख संघटनांनी निषेध केला आहे.
मान्यता घेण्याचे टाळून मुद्दामहून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न
आर. आर. परदेशी ही शाळा मनपा हद्दीत सुरू झाली आहे. त्या वेळेस या शाळेला मनपा प्रशासन अधिकाऱ्यांची मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र, संस्थाचालकांनी प्रथम मान्यता घेतली नाही. त्यानंतर अनधिकृतरीत्या ग्रामीण भागात शाळा स्थलांतरित केली. कार्यालयात कोणीही पैशांची मागणी केली. संस्थाचालकांनी मुद्दाम टेबलावर पैसे ठेवत दबाब निर्माण केला. - राकेश साळुंखे, शिक्षणाधिकारी

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e