शिरपूर तालुक्यातील एका युवतीचा बळजबरीने गर्भपात करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या संशयावरुन धुळे येथील फाशी पुलावरील तुषार हॉस्पिटलचे संचालक डॉ. एम. एस. रघुवंशी यांच्यासह युवकाविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
मृत युवती शिरपूर तालुक्यातील एका खेड्यामधील रहिवासी आहे. तिच्याशी संशयित अमृत आनंदा पाटील याने शरीरसंबंध ठेवल्याने तिला गर्भधारणा झाली. संशयिताने तिला धुळे येथील डॉ. रघुवंशी यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलावून तपासले असता चार महिन्यांचा गर्भ असल्याचे आढळले. त्याने गर्भपाताबाबत सांगितले असता तिने नकार दिला. मात्र त्या युवतीने नकार देऊन देखील अमृत पाटील याने डॉ. रघुवंशी यांच्याकडून बळजबरीने तिचा गर्भपात करुन घेतला.
गर्भपात करताना निष्काळजीपणा केल्यामुळे पीडित तरुणीच्या गर्भाशयात गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला. रक्त साठून राहिल्याने इन्फेक्शन झाले. त्यानंतर काही दिवसांनी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
0 Comments