याबाबत सविस्तर माहिती अशी की, सख्ख्या भावानेच चाकू भोकसून २३ वर्षीय तरुण भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या मालेगावातील नूरबागमध्ये समोर आली. जाविद अहमद मोहम्मद जमील असे मृत तरुणाचे नाव आहे. तर मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील असे आरोपी भावाचे नाव आहे.
मृत जाविद व आरोपीमध्ये सतत भांडणे होत होती. या वादातूनच मुद्दसीरने जाविदचा खून केला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांवनी धाव घेत आरोपी भावाला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची काही जण छेड काढत असल्याने ती मानसिक तणावात होती. यातूनच तिने जीवन संपल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिम परिसरातील ही घटना आहे. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत
0 Comments