टेकाडे/ प्रतिनिधी . शिरपूर तालुक्यातील आर.सी पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खोंडे हे होते. शब्दसुमनांनी उपस्थित सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर पालक सभेला सुरुवात झाली त्यात मुख्याध्यापक रवींद्र खोंडे यांनी उपस्थित पालकांना आपला पाल्य शाळेत नियमित यावा छोट्या छोट्या कारणांसाठी त्याला घरी ठेवू नये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपस्थिती किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले त्यासोबतच विद्यार्थ्यांना दररोज पालकांनी एक ते दीड तास देऊन त्यांचा गृहपाठ दररोज करून घ्यावा त्याबरोबरच पाढे पाठांतर,स्पेलिंग पाठांतर, वाचनाचा सराव अशा गोष्टी सातत्याने घेत राहाव्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे बेसिक कौशल्य विकसित होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासा संदर्भात भीती वाटत नाही व विद्यार्थी आवडीने दररोज शाळेत येतात तसंच शालेय गणवेश 100% विद्यार्थ्यांनी घ्यावा व तो वापरावा माता पालकांनी आपल्या पाल्यांना दररोज स्वच्छ आंघोळ करून नीटनेटका गणवेश घालून तसेच त्यांच्या दप्तरात हवे असेल तेवढे साहित्य भरून पाठवावे अशा छोट्या छोट्या सूचना पालकांना दिल्या कारण प्राथमिक वर्गात विद्यार्थ्यांना अपेक्षित कौशल्य प्राप्त झाले म्हणजे ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत नाहीत त्यांना अभ्यासाची सवय लागते व असे विद्यार्थी जीवनात पाहिजे ते यश मिळवू शकतात अशी अनेक उदाहरणं मुख्याध्यापकांनी पालकांसमोर मांडली परिस्थिती शिक्षणाच्या कधीच आड येत नाही या संदर्भातील उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हाधिकारी आदरणीय राजेंद्र भारूड यांच्यासारखे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपली शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवा असं आपल्या पाल्यांच्या मनावर बिंबवा असा सल्ला मुख्याध्यापकांनी उपस्थित पालकांना दिला पालक सभेत पालकांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तर देऊन पालकांचे समाधान केले सभेत चर्चा झालेल्या अनेक मुद्द्यांवर पालकांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले मुख्याध्यापकांनी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या सुसज्ज व अद्ययावत अशा सर्व सुविधा पालकांना दाखवल्या ते पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब अमरीश भाई पटेल, कार्याध्यक्ष भाईसाहेब भूपेश भाई पटेल, उपाध्यक्ष भाऊसो राजगोपाल भंडारी साहेब, संस्थेचे सीईओ डॉक्टर उमेश कुमार शर्मा साहेब यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन विद्यार्थी मोठ्या पदांवर गेले पाहिजेत हे स्वप्न आहे असे पालकांना सांगितले त्यासाठी ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचे काम विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे करिता पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याध्यापकांनी पालक सभेत उपस्थित सर्व पालकांना केले शिरपूरचा मुलगा कुठेही कमी पडू नये असे आदरणीय भाईसाहेब यांचे यांचे नियमित आम्हाला सांगणे आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी शिक्षक आणि पालक मिळून विद्यार्थ्यांवर संस्कार केले गेले पाहिजे यासाठी मुलांना पालकांनी वेळ दिला पाहिजे पालक सभेत सर्व शिक्षकांच्या वतीने मुख्याध्यापकांनी पालकांना सांगितले उपस्थित पालकांनी शाळेला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शाळा शंभर टक्के डिजिटल करण्यासाठी पालकांच्या वतीने सुद्धा सहकार्य राहील असे ग्वाही पालकांनी मुख्याध्यापकांना दिली.उपस्थित सर्व पालकांना चहा पाणी देऊन शब्दसुमनांनी उपस्थित पालकांचे आभार मानून पालक सभेचा समारोप करण्यात आला. या पालक सभेच्या नियोजनासाठी शाळेतील ज्येष्ठ उपशिक्षक संजय पाटील, उपशिक्षिका बबीता काटो ळे, जयश्री पाटील,बालवाडी शिक्षिका सुनंदा सोनार शिक्षकेतर कर्मचारी भाईदास पावरा, ज्ञानेश्वर वारूडे यांनी सहकार्य केले
0 Comments