शिवसेनेचे आमदार पाडवी यांनीच ठोकले कुलूप; जिल्हा परिषदेतील धुसफूस चव्हाट्यावर

शासन दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाचे आयोजन समाजकल्याण विभागाने केले होते. मात्र समाजकल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतींनाच विश्‍वासात न घेता साधे त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही नसल्याचा गंभीर प्रकार घडला
तसेच शिवसेनेचे आमदार आमश्या‍ पाडवी यांनीही कार्यक्रमाला निमंत्रण नसल्याने जिल्हा परिषदेच्या सत्ता उलथापालथीमध्ये मुख्य भूमिका बजावणाऱ्यांनाच डावलेले जात असेल तर सभापतिपदाचा काय उपयोग, असा संतप्त सवाल करीत आमदार आमश्‍या पाडवी यांनी थेट जिल्हा परिषदेत जाऊन संतप्त भावना व्यक्त करीत समाजकल्याण सभापतींच्या दालनाला कुलूप ठोकत त्याची चावी समाजकल्याण अधिकाऱ्यांना सोपविल्याचा प्रकार घडला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.दिव्यांगांच्या दारीचे निमंत्रणच नाहीनंदुरबार जिल्हा परिषदेत गेल्या वर्षी झालेल्या सत्तांतरामध्ये शिवसेने (ठाकरे गट)चे दोन सदस्यांनी भाजपला पाठिंबा देत सत्तांतर घडवून आणले. त्या वेळी आमदार आमश्या‍ पाडवी यांच्या दोन सदस्यांना सभापतिपद देण्यात आले. त्यात त्यांचा मुलगा शंकर पाडवी यांनाही समाजकल्याण सभापतिपद देण्यात आले. वर्ष उलटत नाही तोच जिल्हा परीषद पदाधिकाऱ्यांमध्ये धूसफूस वाढली आहे.काहीना काही कारणांनी पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत असतानाच नुकताच गुरुवारी (ता. ७) नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी शासन-प्रशासनातर्फे शासन दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी केले. एवढा मोठा कार्यक्रम घेत असताना दिव्यांग समितीचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण दिले गेले.मात्र जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शंकर पाडवी यांना साधे निमंत्रण व पत्रिकासुद्धा दिली गेली नाही, तसेच जिल्हा परिषदेत सत्तेचे वाटेकरी असलेले आमदार आमश्‍या पाडवी यांनाही निमंत्रण नाही. म्हणजेच हे मुद्दाम टाळले गेले की कोणी त्यासाठी आडकाठी आणली हा संशोधनाचा भाग आहे
असे असले तरी दोन्ही पिता-पुत्रांना कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. म्हणजेच समाजकल्याण सभापतींचे महत्त्वच नाही. त्यामुळे त्याचा राग येत जर सभापतींना महत्त्व नसेल तर ते सभापतिपदी राहून काय करतील. त्यापेक्षा त्यांच्या दालनाला कुलूप ठोकून त्यांचा कारभार समाजकल्याण अधिकाऱ्यांनीच चालवावा, अशी संतप्त भूमिका आमदार आमश्‍या पाडवी यांनी घेतली.सभापती बदलाची चर्चादोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत येऊन थेट त्यांचे पुत्र तथा समाजकल्याण सभापती शंकर पाडवी यांचा दालनाला कुलूप लावून त्याची चावी समाजकल्याण अधिकाऱ्यांना दिली. मात्र हे सर्व घडत असताना समाजकल्याण अधिकाऱ्यांनी आमदार पाडवी यांचे रुद्रावतार पाहून कार्यालयातून निघून जाणे पसंत केले.त्यामुळे या प्रकाराबाबत गंभीर चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी निमंत्रण दिले नाही की त्यांना निमंत्रण देण्यापासून रोखले गेले याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातून सभापती बदलाचीही चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.पोलिस विभागाच्या कार्यक्रमातही डावललेदरम्यान, रविवारी (ता. १०) अक्कलकुवा येथे ‘पोलिस दादाहा सेतू’ या उपक्रमाचे उद्‍घाटन पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम पोलिस विभागाचा होता. आमदार आमश्‍या पाडवी यांच्या कार्यालयासमोर तो झाला. आमदार तेथे उपस्थित होते. मात्र त्या कार्यक्रमालाही आमदार आमश्‍या पाडवी यांना निमंत्रण दिले गेले नाही. यामुळे त्याचाही रोष आमदार पाडवी यांनी पोलिस अधिकाऱ्यांविषयी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e