सणासुदीच्या निमित्ताने मिठाईस वाढती मागणी लक्षात घेता बाजारात भेसळयुक्त मिठाईची विक्री होत आहे. पर राज्यातून येणारा भेसळयुक्त मावा आणि मिठाईचा वापर शहरातील मिठाई विक्रेत्यांकडून केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याविरुद्ध कारवाई केली जात आहे. शुक्रवार (ता. १५) द्वारका भागात कारवाई करत भेसळयुक्त मावा आणि पावडरपासून तयार केलेली मिठाईच्या पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. गणेशोत्सवात विविध प्रकारच्या मिठाईचा प्रसाद घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भाविकांमध्ये वाटप करण्यात येतो. खरेदी केलेली मिठाई भेसळयुक्त नाही ना, याची खात्री करून घ्यावी
शक्य असल्यास प्रसाद किंवा भेट देण्यासाठी घरात दुधापासून तयार केलेली मिठाईचा वापर करण्यात यावा. बाजारात बहुतांशी ठिकाणी पावडरयुक्त मिठाई तयार केली जात आहे.भेसळयुक्त मावा आणि मिठाई विक्रीचे राज्यातील विविध शहरे, तसेच परराज्याशी संबंध आहे. गुजरात, अहमदाबाद, राजस्थान यांसह मुंबई येथून शहरात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त मावा येत असतो. त्यापासून मिठाई तयार केली जाते.
0 Comments