जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (शनिवार) नंदूरबारची बंदची हाक देण्यात आली आहे. जालन्यातील घटनेनंतर अज्ञातांनी एसटी महामंडळाच्या बसला लक्ष केले हाेते. त्यामुळे नंदूरबार शहार बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने सेवा बंद ठेवली आहे.
जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज नंदुरबार शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नेत्रक-शेवाळी महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन करण्यात येणार आहे. दरम्यान आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील चार ही एसटी आगारांतून एक ही बस सुटणार नसल्याचे एसटी महामंडळाने घाेषित केले आहे
दरम्यान जिल्ह्यातील बसेस बंद राहिल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. तसेच महामंडळाचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.
0 Comments