दूध भेसळ विरोधात धडक; शहाद्यात एका डेअरी चालकावर गुन्हा

नंदुरबार : दूध भेसळीच्या विरोधात दूध भेसळ नियंत्रण समितीच्यावतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. या समितीने शहादा तालुक्यात हि कारवाई सुरु केली असून अनेक दूध डेअरीवरील दुधाचे नमुने घेतले तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तर अन्न परवाना नसलेल्या एका डेअरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
नंदुरबार जिल्ह्यात दूध भेसळीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत अनेक तक्रारी जिल्हा नियंत्रण समितीकडे प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींची दखल घेत जिल्हा नियंत्रण समिती आणि (FDA) अन्न औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईच्या सत्र सुरू आहे. या कारवाईत आज शहादा तालुक्यातील खाजगी दूध डेअरी तसेच खाजगी दूध विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.  
दुधाचे नमुने घेत पाठविले प्रयोगशाळेत 

अनेक ठिकाणचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर एका डेअरी चालकाकडे अन्न औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्याने त्याच्या विरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अचानक दूध विक्रेत्यांचा विरोधात सुरू झालेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e