तलासरी येथे महाराष्ट्र - गुजरात सीमा तपासणी नाक्यावर एसीबीची धाड, मोटार वाहन निरीक्षकाला खासगी सहकाऱ्यासह अटक

मुंबई - कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या तलासरी सीमा तपासणी नाक्यावर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी पहाटे ४.५८ वाजताच्या दरम्यान धाड टाकली. महाराष्ट्रातून गुजरात कडे जाणाऱ्या वाहनांकडून पैसे घेण्याचे काम सुरू असताना पोलिस निरीक्षक संदीप घुगे यांनी एका मोटार वाहन निरीक्षक आणि त्याच्या खासगी सहकाऱ्याला रंगेहाथ पकडले. मात्र, इतर मोटार वाहन निरीक्षक आणि कर्मचारी तपासणी नाक्यावरून पळून जाण्यास यशस्वी झाले असून, पळून जाणारे अधिकारी, कर्मचार्यांचा शोध सुरू आहे. रात्रपाळीत ड्युटीवर असलेल्या अधिकारी कर्मचार्यांची माहिती घेऊन सहआरोपी करण्याच्या दिशेने ए सी बी चा तपास सुरू आहे.याप्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या निरीक्षक निळोबा तांदळे रा.खारघर आणि सुनील भोईर यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनिमान्वये कारवाई केली आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या जिजे ३ बिझेड ५१९८ क्रमांकाच्या वाहन चालकांकडून 
आरटीओ तपासणी नाक्यावर ३०० रुपयाची लाच मागितली होती.वाहन चालक राजेंद्र वाघ यांनी ए सी बी कडे केलेल्या तक्रारीनंतर सोमवारी पहाटे ४.५८ वाजेच्या दरम्यान मोठ्या शिताफीने अँथ्रासीन पावडर लावलेले पैसे देतांना आरटीओ अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात ए सी बी ला यश आले आहे. याप्रकरणातील फिर्यादी राजेंद्र वाघ यांच्या तक्रारीमध्ये मोटार वाहन निरीक्षक सतीश खरवडकर, अमित गांगल, दिनेश बागुल, उज्वल भावसार या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले आहे. मात्र, ए सी बी अधिकाऱ्यांच्या कारवाई दरम्यान अनेकांनी तपासणी नाक्यावरून पळ काढला असून, ए सी बीच्या तावडीतून सुटले आहे. मात्र आता रात्रपाळीत कोणकोणत्या अधिकारी कर्मचाऱ्यांची ड्युटी होती. जे पळून गेलेत अशा सर्वांची कसून चौकशी होण्याची शक्यता असून, चौकशी दरम्यान अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
सील केलेल्या खोली चे रहस्य काय ?ए सी बी ने आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर चेक पोस्टला लागून असलेल्या परिवहन भवनातील एका खोली सील केली आहे. ३०० रुपयाच्या लाच घेण्याच्या प्रकरणात खोली सील करण्याची वेळ का आली असावी ? असा प्रश्न उपस्थित होत असताना. सील केलेल्या खोलीचे रहस्य नेमके काय आहे.हे अजूनही गुपितच असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र, यादरम्यान सोमवारी रात्री सुमारे ११ वाजता नंतर संपूर्ण तलासरी चेक पोस्टची वीज पुरवठा खंडित झाल्याने काहिवेळासाठी नाका काळोखात गेला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.रात्रपाळीत ड्युटी असणारे अधिकारी, कर्मचारीठाणे आरटीओ अधिकाऱ्यांच्या मार्फत तलासरी सीमा तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांची ड्युटी लावल्या जाते. त्यासाठी अधिकाऱ्यांना चार ग्रुप मध्ये नियुक्त केल्या जात असून, तीन शिफ्ट मध्ये नाक्यावरील काम चालते.सोमवारी रात्रपाळीत पहिल्या म्हणजे अ ग्रुपची ड्युटी होती. ज्यामध्ये मोटार वाहन निरीक्षक सुरेंद्र चौरे, निळोबा तांदळे, सतीश खरवडकर, चंद्रमोहन चींतल, अमित गांगल, दिनेश बागुल, उज्वल भावसार तर शिपाई मनोज परमार यांचा त्या ग्रुप मध्ये समावेश आहे.
क्रमांक १ चे उत्पन्न मिळवणारा तपासणी नाकाराज्य मोटार वाहन विभागाच्या एकूण २४ सीमा तपासणी नाक्या पैकी तलासरी सीमा तपासणी नाका राज्यात पहिल्या क्रमांकाचे कोट्यवधींचा अधिकृत महसूल मिळवून देणारा नाका आहे. एका शिफ्ट मध्ये साधारण ३० हजार वाहन जरी नाक्यावरून ये - जा करत असल्यास ३०० रुपयाप्रमाणे तब्बल ९० लाखांचे उत्पन्न होते. त्याप्रमाणे मासिक आणि वार्षिक बेकायदा उत्पन्न काढल्यास धक्कादायक आकडेवारी पुढे येतांना दिसते.
ए सी बी च्या कारवाईकडेही लक्षपालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात असलेल्या नाक्यावर नाशिक मधून आलेल्या ए सी बी च्या पथकाने कारवाई केली आहे. मात्र, कारवाईत पालघर जिल्ह्यातील एसीबी च्या अधिकाऱ्यांचा कुठेही सहभाग नसून, ठाणे एसीबी चे पोलीस उपअधीक्षक प्रमोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई केली आहे.या कारवाईत मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी कारवाई नंतर प्रमोद जाधव यांनी २४ तास काम करून घटनेची चौकशी आणि पंचनामा केला आहे. तर रात्री तलासरी येथील शासकीय विश्राम गृहावर थांबून पुढील कारवाईत फिर्यादींच्या जवाब घेण्यात आले आहे.
सीसीटीव्हीत घटना आणि नाक्यावरील गैरप्रकार कैदअत्यंत महत्वाचा आणि सर्वाधिक जास्त रहदारी असलेल्या या तपासणी नाक्यावर हाय रेज्युलेशनचे कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी पहाटे ४ वाजता पासून झालेल्या संपूर्ण प्रकरणाचे चित्रण या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असावे. तपासणी नाक्यावरील सोमवारी रात्री होणाऱ्या काही हालचाली सीसीटीव्ही मध्ये दिसू नयेत यासाठी तर रात्रीच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित केला नसावा ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.याप्रकरणात दोन आरोपी पकडण्यात आले आहे. कारवाई दरम्यान जे पैसे स्वीकारत होते. त्यांना पकडण्यात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे काही पळूनही गेले असावे. मात्र, सध्यातरी मोटार वाहन निरीक्षक निळोबा तांदळे रा.खारघर आणि सुनील भोईर यांच्या विरुद्ध तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.- संदीप घुगे, पोलिस निरीक्षक, ए सी बी ऑफिस नाशिक

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e