अपहरण केलं, डोळ्यावर काळी पट्टी बांधली अन् सुरतजवळ सोडलं, नाशिकचे हेमंत पारख घरी परतले, पण...

नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या राहत्या घरापासून अपहरण केले होते.
नाशिक : नाशिक  शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या राहत्या घरापासून अपहरण केले होते. त्यानंतर काही तासातच पारख हे सुखरूप घरी पोहचले, मात्र या घटनेतील अपहरणकर्त्यांचा तीन दिवस उलटूनही अद्याप तपास लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर संशयितांच्या शोधासाठी परराज्यासह ईतर ठिकाणी पोलिसांची 8 पथके रवाना करण्यात आली असून तपास प्रगतीपथावर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 
बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख  यांचे नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील राहत्या घराबाहेरुन 2 सप्टेंबरला अपहरण  करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुदैवाने दुसऱ्या दिवशी दुपारी ते घरी सुखरुप परतले होते, मंत्री छगन भुजबळांसह भाजपच्या स्थानिक आमदारांनी पारख यांची घरी जाऊन भेट देखील घेतली होती. विशेष म्हणजे या घटनेला आता तीन दिवस उलटून देखील अपहरणामागील गूढ अद्याप कायम आहे. चारचाकीमधून अपहरण करताच त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात आली होती आणि सुरतजवळ त्यांना सोडून देण्यात आले होते. दरम्यान पारख यांचे अपहरण नक्की का करण्यात आले होते? कोणी केले होते? याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. स्वतः हेमंत पारख किंवा कुटुंबीयही या घटनेवर बोलण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. 


नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या राहत्या घरापासून अपहरण केले होते. रविवारी पारख यांनी नातेवाईकांना संपर्क साधून माहिती कळवली. नातेवाईकांसह पोलिसांचे पथक त्या दिशेने रवाना झाले. यानंतर काही तासांत पारख यांना सुखरुप घरी आणले, मात्र त्यांचे अपहरण कोणी व कोणत्या कारणांतून केले? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. वलसाड सुरत मार्गावर  अपहरणकर्त्यांनी रविवारी पहाटे सोडून पोबारा केल्याचे पारख यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी करुन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पारख यांच्या अपहरणामागील उद्देश, कारण व कट रचला कोणी? त्यांना सोडून अपहरणकर्ते कसे व कोठे पळून गेले? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. 


संशयितांच्या मागावर पोलिसांची आठ पथके 

दरम्यान अपहरणकर्त्यांनी पारख यांच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधली होती. यामुळे पारख यांना ते कोठे घेऊन चालले हे कळत नव्हते, असे त्यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले. तसेच गुन्ह्यात अपहरणकर्त्यांनी ज्या मोटारीचा वापर केला, त्या मोटारीला नंबर प्लेट नव्हती. संशयितांच्या मागावर पोलिसांची आठ पथके संशयित आरोपींच्या मागावर एकूण आठ पथके रवाना करण्यात आली आहेत. दोन पथकांकडून परराज्यांमध्येही अपहरणकर्त्यांचा शोध घेतला जात आहे. विविध ठिकाणांचे टोलनाके व तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेजही तपासले जात आहे. दरम्यान तीन दिवस उलटूनही अद्याप संशयितांचा तपास लागलेला नाही, त्यामुळे पोलिसांपुढे संशयितांना शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e