स्वयंपाक कमी केल्याच्या रागातून पतीने पत्नीला हातोड्याने मारहाण केल्याचा प्रकार पंचवटी परिसरातील वाघाडी येथे घडला. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पती घरी आल्यानंतर जेवण करत असताना स्वयंपाक संपला. पतीने स्वयंपाक कमी का केला अशी विचारणा करत रागातून घरात पडलेला हातोड्याने पत्नीला मारहाण केली. यात पत्नीच्या डोके, हात व कमरेला मार बसला. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
0 Comments