जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीचा दुवा असलेल्या पंचायत समितीचा कार्यभार अशा पद्धतीने चालत असल्याने सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर चकरा माराव्या लागत असल्याने वेळेसह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.शिंदखेडा पंचायत समितीची अधिकारी व कर्मचारी अशी एकूण एक हजार ४९ मंजूर, तर ८३६ पदे कार्यरत असून, २१३ पदे रिक्त असल्याने यांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकारी व कर्मचारी पाहत असून, त्यांच्यावर भार पडत असल्याने विकासकामांना ‘खीळ’ बसत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना काही कर्मचारी इतर ठिकाणी डेपोडेशनवर देण्यात आले आहेत. त्यांना परत बोलवणे गरजेचे आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील-जाधव यांचे माहेर कमखेडा व सासर नेवाडे हे शिंदखेडा तालुक्यातील, मालपूर येथील महावीरसिंह रावल हे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती व नरडाणा येथील संजीवनी सिसोदे या महिला व बालकल्याण सभापती तालुक्यातील तरी पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे."शिंदखेडा येथील महिला व बालकल्याण विभागाचे प्रकल्प एक व दोन येथील सीडीपीओ यांच्या रिक्त जागा आहेत. त्या भरण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे. राज्य शासन जोपर्यंत सीडीपीओ यांच्या नियुक्त्या करत नाही तोपर्यंत प्रभारी अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार असणार आहे.'' -संजीवनी सिसोदे, महिला व बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद, धुळे
रिक्त पदेसंवर्ग मंजूर कार्यरत रिक्तअधिकारी वर्गगटविकास अधिकारी १ ० १सहाय्यक गटविकास अधिकारी १ ० १गटशिक्षणाधिकारी १ ० १सीडीपीओ (प्रकल्प एक व दोन) २ ० २उपअभियंता (बांधकाम) १ ० १उपअभियंता (लघुसिंचन) १ ० १उपअभियंता (पाणीपुरवठा) १ ० १पशुधन विकास अधिकारी १ ० १प्रशासन विभागकनिष्ठ सहाय्यक ३२ ३१ १कृषी अधिकारी १ ० १विस्ताराधिकारी (कृषी) ३ २ १विस्ताराधिकारी (सांख्यिकी) १ ० १वाहनचालक १२ २ १०परिचर ७९ ५५ २४आरोग्य विभागविस्ताराधिकारी १ ० १औषधनिर्माण अधिकारी ८ ७ १आरोग्य सहाय्यक (पुरुष) १० ८ २आरोग्य सहाय्यक (महिला ) ८ ६ २आरोग्यसेवक (पुरुष) २४ १८ ६आरोग्यसेवक (महिला) ४७ २० २०बांधकाम उपविभागशाखा/कनिष्ठ अभियंता ९ ४ ५स्थापत्य अभियंता सहाय्यक १७ ६ ११आरेखक १ ० १लघुसिंचन उपविभागशाखा/कनिष्ठ अभियंता ५ ३ २स्थापत्य अभियंता सहाय्यक १ ० १ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागशाखा/कनिष्ठ अभियंता ६ २ ४ग्रामपंचायत विभागग्रामविकास अधिकारी १७ ११ ६ग्रामसेवक ८७ ८० ७पशुसंवर्धन विभागसहाय्यक विकास अधिकारी ३ २ १पशुधन पर्यवेक्षक ११ ८ ३महिला व बालविकास प्रकल्प एक/दोनपर्यवेक्षिका (प्रकल्प एक) ७ ३ ४वरिष्ठ सहाय्यक (लेखा, प्रकल्प एक) १ ० १पर्यवेक्षिका (प्रकल्प दोन) ७ २ ५शिक्षण विभागविस्ताराधिकारी ८ ४ ४केंद्रप्रमुख १५ ६ ९मुख्याध्यापक २५ १५ १०विषय शिक्षक १५ ७ ८उपशिक्षक ५५८ ४९९ ५९एकूण १,०४९ ८३६ २१३
0 Comments