शहरात मोठ्या प्रमाणात वाहनातून अवैद्य गुटखा पुड्यांचा साठा विक्रीसाठी आणला जात आहे. या संदर्भात माहिती मिळाल्याने पोलीस पथकातर्फे (Police Team) शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर गस्त घालत लक्ष ठेवले जात आहे. नामपूर भागातून कारमधून गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी वडनेर शिवारात सापळा लावला होता.
यावेळी मारुती व्हॅन भरधाव वेगाने येत असल्याचे दिसताच पोलिसांनी थांबून तिची तपासणी केली असता दोन लाख ५४ हजाराचा सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा पुड्यांचा साठा दिसून आल्याने पोलिसांनी कारसह जप्त केला.
0 Comments