अनेकदा आपल्या आयुष्यात आपण असा कोणता ना कोणतातरी चुकीचा निर्णय घेतो ज्यामुळे आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो. काही गोष्टींचा परिणाम काही काळापर्यंत असतो तर काही गोष्टी आयुष्यभर बदलत नाहीत. पश्चात्ताप अत्यंत त्रासदायकही असू शकतो. एक चूक आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरते.
माझ्याही आयुष्यात असंच काहीतरी घडलं ज्यामुळे मी आयुष्यात कधीच पुन्हा नीट जगू शकणार नाही. माझं संपूर्ण आयुष्य मी माझ्या हातानाचे उद्ध्वस्त केलं आहे. प्रेम, मैत्री, नातं काहीच माझ्या आयुष्यात राहीलं नाही आणि मी माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचा विश्वासही गमावला. तिच्याच नवऱ्याशी लग्न करून आयुष्यभरासाठी फक्त दुःख ओढवून घेतलंय. प्रियाने (नाव बदललं आहे) आपला अनुभव शेअर करत स्वतःला कसं सांभाळायला हवं आणि नात्यांचे महत्त्व समजावून सांगितले आहे
मी आणि साक्षी (नाव बदलले आहे) कॉलेजपासूनच बेस्ट फ्रेंड्स. दोघीही कायम एकमेकींना पाठिंबा देत होते. तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण होतं. साक्षीचा साधेपणा सर्वांना आकर्षित करायचा आणि ती पटकन सर्वांमध्ये मिक्स व्हायची.
मात्र यामुळे मला तिचा सतत द्वेष वाटत राहायचा. कारण सर्वच जण तिच्याकडे आकर्षित व्हायचे. मात्र जेव्हा सर्वात पहिले आयुष्यात मला बॉयफ्रेंड मिळाला आणि त्याला साक्षीच्या मोबाईलमध्ये नंबर देताना पाहिले आणि एकमेकांशी हसत बोलताना पाहिले तेव्हा मात्र सहन झाले नाही. पण मी साक्षीशी मैत्री न तोडता बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केले. पण मनात तो द्वेष कायम राहिला.
कॉलेज संपल्यावरही आमची मैत्री कायम होती. साक्षीचे लग्न झाले. मात्र नोकरीनिमित्त मी बाहेरगावी असल्याने मला लग्नाला येता आले नाही. पण एका अयशस्वी नात्यानंतर पुन्हा एकदा मी स्थिर होण्याचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा परत आले तेव्हा साक्षी आणि तिच्या नवऱ्याशी भेट झाली. तिचा नवरा अत्यंत चार्मिंग असल्याने पुन्हा एकदा माझ्यातला द्वेष उफाळून आला. मला असा जोडीदार का मिळाला नाही याचा मनात राग येऊ लागला
साक्षी आणि तिचा नवरा इतका प्रेमात असलेला पाहून मला अजिबात आवडत नव्हतं आणि एक दिवस सर्वकाही चुकीचं घडायला सुरूवात झालीच. मी साक्षीच्या घरी गेले असता साक्षी कॉफी बनवायला आत गेली. मात्र तिच्या नवऱ्यात आणि माझ्यात आकर्षण निर्माण होऊन आम्ही एकमेकांना किस केले. साक्षी आल्यानंतर दोघेही अत्यंत नॉर्मल वागत होतो.
त्या दिवसानंतर तिचा नवरा आणि मी दोघांमध्ये अधिक भेटीगाठी वाढू लागल्या आणि शारीरिक संबंधही आले. जेव्हा साक्षी कामानिमित्त बाहेर जात असे आम्ही एकमेकांबरोबर एकांतात वेळ घालवू लागलो. एकदा बेडरूममध्ये असताना अचानक साक्षी आली आणि सर्व काही संपलं. साक्षीला समजावणं शक्यच नव्हतं कारण तिच्या नजरेत माझ्यासाठी फक्त राग आणि राग होता. त्यानंतर आम्ही कधीही भेटलो नाही.
0 Comments