अपहरण करून खंडणी मागणाऱ्या शहाद्यातील दोघांना जन्मठेप

शहादा येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या पालकांकडून २० लाखांची खंडणी मागितल्याच्या घटनेतील शहादा येथील दोघांना शहादा न्यायालयाने जन्मठेपेसह पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. आठ वर्षांपूर्वीची ही घटना होती. अखेर विद्यार्थ्यांच्या पालकांना न्यायालयाकडून आठ वर्षांनी न्याय मिळाला मोलगी (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) येथील प्राथमिक शिक्षिका कमलाबाई नामदेव चव्हाण यांचा मुलगा रूपेश नामदेव चव्हाण (वय २२) शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. ३१ ऑगस्ट २०१५ ला कमलाबाई चव्हाण यांना त्यांच्या मुलाच्या फोनवरून एकाने फोन करून सांगितले, की त्यांचा मुलगा रूपेश चव्हाण याचे अपहरण केले असून, त्यास सोडविण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. कमलाबाई चव्हाण यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून २ सप्टेंबरला २०१५ ला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा अपहरण करून खंडणी मागणे यांसारखा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी अभिलाष शंकर पटेल (२२, रा. कर्जोत, ता. शहादा) व दीपक विजय बागले (२३, रा. समतानगर, मलोणी, ता. शहादा) यांना ५ सप्टेंबर २०१५ ला तत्काळ अटक करण्यात आली होती. शहादा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी
अभिलाष शंकर पटेल व दीपक विजय बागले यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात सादर केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच आणि परिस्थितीजन्य पुरावे, तपास अधिकारी यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तिवाद या सर्व बाबींचा विचार करून आरोपी अभिलाष शंकर पटेल व दीपक विजय बागले यांना भारतीय दंडसंहितेच्या कलम ३६४ (अ)मध्ये जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७ मध्ये १० वर्षे कारावासाची शिक्षा व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.खटल्याचे कामकाज जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, शहादा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी केले असून, न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. एस. ए. गिरासे यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाणे, हवालदार परशुराम कोकणी, देवीदास सूर्यवंशी यांनी कामकाज केले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e