नाशिक : सोशल मीडियाचा अतिरेक इतका झाला आहे की, कोण कधी कुणाला ब्लॅकमेल करेल हे सांगता हे येणं शक्य नाही. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या डॉक्टर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरून भाजपचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांचा मुलगा संशयित संदीप दोंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यातमोबाईल महत्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे कुठेही, कधीही मोबाईल सर्रासपणे वापरला जातो. मात्र याच माध्यमातून हल्ली फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. अनेकदा महिलांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे जणू साधनच झाल्याचे वारंवार अनेक घटनांवरून उघडकीस आलं आहे. अशातच नाशिकमधील एका डॉक्टर तरुणीला इंस्टाग्रामचा चांगलाच फटका बसला आहे.इन्स्टाग्रामवरून ओळख करत आधी नंतर प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शरिरसंबंध ठेवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडित डॉक्टर महिलेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी पिडितेच्या फिर्यादीनुसार भाजपचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांचा मुलगा संशयित संदीप भगवान दोंदे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित फिर्यादी महिला व संशयित संदीप यांच्यामध्ये जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत अन् प्रेमात झाले. त्यानंतर संशयित हा पिडितेला भेटण्यासाठी भेटण्यासाठी तिच्या घरी ये-जा करू लागला. यावेळी ‘माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, आपण विवाह करू...’ असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर पिडितेने त्यास आई-वडिलांना त्यांच्या नात्याची माहिती देण्यास सांगितले. दरम्यान, संशयित संदीप याने एकेदिवशी पिडितेच्या घरी येऊन तिच्याशी जवळीक साधून बळजबरीने शरिरसंबंध प्रस्थापित केले. यावेळी पिडितेने त्यास विरोध करत आक्षेप घेतला. यावेळी संशयिताने तिच्या विरोधाला न जुमानता शारीरिक संबंध ठेवले.
संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान यातून पीडिता गर्भवती राहिल्याचे लक्षात आले. याबाबत पीडितेने संशयितांस याबाबत कल्पना अदिती, मात्र आपल्याला नको असल्याचे सांगत गर्भपात करण्या सांगितले. त्यानुसार संशयिताने गर्भपाताच्या गोळ्या आणून देत त्या सेवन करण्यास सांगितले. यामुळे गर्भपात झाल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा असाच प्रकार घडल्याने पीडितेने याबाबत संशयितास जाब विचारला. यावर संशयिताने ‘तुझ्याशी माझा काही संबंध नाही, मी तुला लग्नाचे आश्वासन दिलेले नाही, असे सांगून तुझे परिसरात राहणे अवघड करू अशाप्रकारे दम भरला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित संदीपविरूद्ध अत्याचारासह गर्भपातास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरिक्षक मनीषा शिंदे करीत आहेत
0 Comments