राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोटा येथील नांता परिसरात राहणाऱ्या एका युवकाचा खून करण्यात आला होता. लिव्ह इन पार्टनर महिलेनं हा खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. तरूणाच्या कृत्याला कंटाळून हा खून केल्याचं महिलेनं सांगितलं आहे.
रामगंजमंडी येथील नरेश ( ३० वर्ष ) असे मृत व्यक्तीचं नाव आहे. तर, किरण बाई असं खून करण्यात आलेला लिव्ह इन पार्टनर महिलेचं नाव आहे. किरण बाईला पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे
नेमकं प्रकरण काय?
किरण बाईनं पोलिसांना सांगितल्यानुसार, नरेश दगडं फोडण्याचं काम करत असे. गेल्या आठ महिन्यांपासून नरेश बरोबर लिव्ह ईन पार्टनर म्हणून ती राहत होती. किरणचं पहिलं लग्न झालं असून, तीला दोन मुलंही आहेत. पण, नरेशबरोबरील प्रेमप्रकरणानंतर ती पळून कोटाला आली होती. दोघेही गणेशपाल परिसरात भाड्याच्या घरात राहत होते.
अशातच नरेशनं किरणचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या पतीला पाठवले. यानंतर पतीला पैसे मागावे, नाहीतर सगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी नरेशने किरणला दिली होती. या धमक्यांना किरण वैतागली होती. यातूनच नरेशचा खून करण्याचा प्लॅन तिनं आखला
किरणनं घरात घटस्थापना केली होती. त्याचदिवशी किरणनं नरेशचा खून करायचं ठरवलं. रात्री बारा वाजल्यानंतर झोपलेल्या नरेशवर किरणनं हल्ला केला. दगडानं ठेचून किरणनं नरेशचा खून केला. यानंतर पूर्ण रात्र खोलीच्या बाहेर किरण येऊन बसली होती. सकाळी लवकरच ती निघून गेली.
0 Comments