कल्याणमध्ये दोन गटात तुफान राडा; तलवार, पिस्तूल काढत आपसात भिडले

कल्याण जवळील वडवली गावात बांधकाम साईटवर मातीच्या भरणीच्या वादातून दोन गटात राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी दोन्ही गटाचे लोकांनी तलवारी आणि बंदूक काढत आपसात भिडले आहेत. या राड्यात तीन ते चार जण जखमी झालेत.

या प्रकरणी खडकपाडा पोलीसानी मारहाण करणाऱ्या शिवसेना माजी नगरसेवकासह दोन्ही गटातील सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी शिवसेना माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील वडवली येथे तलावाजवळ एका जागेवर भरणीचे काम सुरू होते. याचदरम्यान गावामधील दोन गटात जमिनीवर सुरू असलेल्या भरणीच्या कामाच्या वादातून हाणामारी झाली. या वादात दोन्ही गटाने एकमेकांना धाक दाखवण्यासाठी धारदार शस्त्र, तलवार व बंदुकी बाहेर काढल्या
यातच शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी पिस्टल दाखवत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हाणामारी तीन ते चार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून खडकपाडा पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, वैभव पाटील पंकज पाटील मनोहर पाटील राहुल पाटील कमलाकर पाटील विरोधात गुन्हे दाखल केलेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e