काल मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दिवाळीसाठी फटाक्याचे स्टॉल लावण्याबाबत परवानगी घेण्यासाठी शहरातील एक जण संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेला होता. त्याने यादव याची भेट घेतली असता परवाना देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी यादव याने केली होती.
तडजोडीनंतर ८०० रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदाराने यादव याच्याबाबत नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रविणकुमार लोखंडे यांनी सापळा रचून यादव याला ८०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. पथकाने यादवला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
0 Comments