संतापजनक! अंथरुणाला खिळलेल्या सासऱ्यांसोबत सुनेचं अमानुष कृत्य; चादर पेटवली, शिवीगाळ केली अन्…VIDEO व्हायरल

आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं काही असेल तर ते आपलं कुटुंब असतं, असं असलं तरीही कुटुंब म्हंटलं की सगळ्यांचे स्वभाव वेगळे त्यामुळे भांड्याला भांडं लागतंच. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सून सासरच्या मंडळींवर एवढी चिडते की ती चक्क घरालाच आग लावते. एवढंच नाहीतर बेडरुममध्ये झोपलेल्या सासऱ्यांच्या अंगावरही ती जळते कागद फेकते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला असून सर्वजण सुनेवर नाराजी व्यक्त करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
असे सांगितले जात आहे की, सुनेला आपल्या मुलाला खायला घालायचे होते, परंतु सासरच्या लोकांना त्याला झोपवायचे होते. याचा राग आल्यानं महिलेने सासरच्या मंडळींना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर महिलेने सासरच्यांची चादरही पेटवली. हा सर्व प्रकार पाहून महिलेच्या पतीने तिला खडसावलेही. तसेच त्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला आहे. तिचा पतीही तिच्या विरोधात बोलताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
@ShoneeKapoor नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (X) वर शेअर केला आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तुम्ही पण पहा हा अतिशय भयानक व्हिडिओ.
लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘देव कोणाला असे दिवस दाखवू नये.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘महिलेची हिम्मत बघा.’
सुनेने केली सासूची हत्या

मुंबईतील चेंबूरच्या पेस्तमसागर येथे सुनेने सासूची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. 70 वर्षांच्या सज्जाबाई पाटील त्यांचा दत्तक मुलगा आणि सुनेबरोबर पेस्तमसागर इथल्या एसआरए इमारतीत राहत होत्या. घाटकोपरमधील एका मंदिरापुढे भीक मागून सज्जाबाई कुटुंबियांची गुजराण करत होत्या. इमारतीतलं घर ही सज्जाबाईच्या नावावर होतं. मुलगा कामावर गेल्यावर सासू सुनेवर संशय घेऊन रोज सुनेला हिणवायची. यावरूनच सून अंजना आणि सासू सज्जाबाईचं भांडण होऊन रागाच्याभरात या सुनेनं सासूची खेळण्यातल्या बॅटनं हत्या केली. बाथरुमध्ये पडल्यानं सासूचा मृत्यू झाल्याचा सुनेचा बनाव पोलिसांनी उघडकीला आणला. 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e