पोलिस शिपाईच निघाला साखळीचोर

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिल्हाधिकारी बंगल्यापासून पायी जाणाऱ्या महिलेची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खेचून नेल्याची घटना घडली होती. या घटनेतील मुख्य संशयित शहर पोलिस दलातील पोलिस शिपाई असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
योगेश शंकर लोंढे असे संशयित पोलिस शिपायाचे नाव असून, तो सध्या गंगापूर राडवरील शहर पोलिस मुख्यालयात नियुक्तीस आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्र्यंबक रोडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानामागील रस्त्याने एक महिला पायी जात होती. त्या वेळी योगेश लोंढे हा अल्पवयीन मित्रासह मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून आला. त्याने सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. महिलेने आरडाओरड केला, परंतु दोघेही पसार झाले. त्या वेळी काही अंतरावर गेल्यावर लोंढे व त्याच्या अल्पवयीन मित्रात वादविवाद झाला.
त्या मित्राने पोलिसांना घटनेची माहिती कळवून प्रकार सांगितला. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनला संशयिताची माहिती समजली. पथकाने संशयित लोंढेस काही वेळातच ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो पोलिस शिपाई असल्याचे समोर आले.नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबई नाका पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर त्याला पोलिस आयुक्तालयाने निलंबित केले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e