आकाश पोपट बाणेकर असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य दीपक रणावरे, सागर लक्ष्मण बनसोडे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजराथ कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित ननावरे आणि आणि निलेश पिंपळेकर या दोघांमध्ये महाबळेश्वर हॉटेलजवळ वाद झाले होते. रोहितला निलेशमुळे कामावरून काढून टाकल्याचा गैरसमज झाला होता. त्यामुळे त्याने निलेशला महाबळेश्वर हॉटेलजवळ भेटायला बोलवले. त्यांच्यात यावेळी वाद झाले. त्यावेळी निलेश याने आकाशला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. त्यावेळी आकाशने रोहित ननवरे याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी देखील त्याने वाद घातला.
तिथून निघून गेलेल्या रोहितने मित्रांना गोळा केले आणि तो पुन्हा बाणेरमधील महाबळेश्वर हॉटेल जवळ आला. आदित्य, सागर यानी त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. आदित्यने बंदुकीमधून त्यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. यातील एक गोळी त्याच्या उजव्या मांडीत लागली. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पळालेला आकाश एकटाच लवळे येथील कासारसाईमध्ये असलेल्या एका रुग्णालयात स्वतःहून उपचारांसाठी दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास चतुशृंगी पोलिस करीत आहेत.
0 Comments