राष्ट्रीय तपास यंत्रणेची मोठी कारवाई, लष्कराची गोपनीय माहिती लीक प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

लष्कराची गोपनीय माहिती लीक प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. गोपनीय माहिती लीक केल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेची मोठी कारवाई केली आहे. यंत्रणेने तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्या प्रकरणी तिसरा आरोपी अमान सलीम शेखला अटक केली आहे. एनआयएने मुंबईत अमानला अटक केली आहे. एनआयएने या प्रकरणात चार जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

अमानवर आयएसआयच्या गुप्तहेरांनी वापरलेली सिम कार्ड ऍक्टिव्हेट केल्याचा आरोप आहे. एनआयएने अमानकडून संवेदनशील कागदपत्रांसह दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

या प्रकरणात आयएसआयच्या दोन फरार गुप्तहेरांसह एकूण चार आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनआयएने मुंबईसह आसामच्या नागाव येथील होजईत धाड टाकली.
एनआयएने १९ जुलै रोजी फरार पाकिस्तानी नागरिक मीर बालाज खान याच्यासह दोन आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्याचबरोबर त्यात आकाश सोलंकीचेही नाव दाखल होतं. आकाश सोलंकी हा नौदलाच्या डॉकयार्डमध्ये इलेक्ट्रिकल आर्टिफिसर रेडिओ अरेंटिस म्हणून काम करत होता.
नौदलाच्या वैद्यकीय खलाशाला अटक
नौदलाच्या वैद्यकीय खलाशाला (मेडिकल सेलरला) लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं आहे. संजू अरालीकट्टी (Sanju Aralikatti) नावाच्या मेडिकल सेलरला सीबीआयने अटक केली आहे. मेडिकल सेलर हा कुलाबा येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता.

मेडिकल सेलरसह अन्य एका सरकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सेलरकडून लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराच्या वैद्यकीय तपासणीचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितली जायची. हा सेलर हा स्वतःच्याच फोन पे खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगायचा.

वैद्यकीय चाचणी ही आयएनएस अश्विनी रुग्णालयात सुरू होती. आरोपीच्या घर झडतीत उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणी संबंधित गुन्ह्याशी निगडित कागदपत्र सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर २२ तारखेपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e