नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाली आहे. पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक हे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. शिंदे यांची गेल्या डिसेंबर २०२२ मध्ये नाशिक पोलीस आयुक्ताचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आाल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली आहे. कर्णिक हे इलेक्ट्रिकल इंजीनियर पदवी प्राप्त केली.त्यानंतर 2004 च्या बॅचचे आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी आहेत. त्यांनी अहमदनगर, ठाणे, नागपुर, जालना, नांदेड यासह पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. मुंबईत त्यांनी अप्पर आयुक्त म्हणून कर्तव्य बजाविले आहे. सध्या ते पुणे आयुक्तालयात सहआयुक्त म्हणून काम पाहत होते. आता ते नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील.
दरम्यान, आयुक्त शिंदे यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. गेल्या १६ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला होता.त्यांच्या ११ महिन्यातील कार्यकाळात शहरातील गुंडागर्दी रोखण्यासाठी मोक्काअंतर्गत कारवाई करीत गुंडांमध्ये दहशत निर्माण केली होती. तसेच, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही कामचुकारपणाबद्दल तात्काळ कारवाई केल्याने पोलीस दलातही वचक निर्माण केला हाेता.पिंपरी चिंचवडचे आयुक्त असतानाही त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आताही नाशिकचा दोन वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली गृहविभागाने केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
0 Comments