शासनाची दिशाभूल करून गैरव्यवहार भोवला ; ग्रा.पं.च्या तत्कालीन सरपंचासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

राज्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या विविध प्रकारच्या निधीचा दुरुपयोग करून अपहार केला जात असल्याचे अनेक प्रकरण समोर आली आहे. असेच एक प्रकरण आता चोपडा तालुक्यातील मजरेहिंगोणा ग्रामपंचायतीमधून समोर आले आहे. मयत व्यक्तीच्या नावाने खोटे दस्ताऐवज तयार करून शासनाची दिशाभूल करीत रकमेचा अपहार केल्याप्रकरणी ग्रा.पं.च्या तत्कालीन सरपंच, उपसरपंचांसह सदस्य आणि तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील ग्रामपंचायतीत पंचायतराज अंतर्गत तत्कालीन सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांनी सन 2022-23 मध्ये पदावर कार्यरत असताना त्यांनी पोपट यादव पाटील पिंताबर दौलत धिवर, उत्तम बाबुराव पाटील, ज्ञावेश्वर सिताराम पाटील हे अनुक्रमे सन 2009,2013,2014,2019, मयत झालेले असताना त्यांच्या नावाने खोटे दस्ताऐवज तयार करुन खोट्या सह्या करुन शासनाकडुन 26 हजार 157 रुपये काढून शासनाची दिशाभुल करुन शासनाकडून येणार्‍या रकमेचा स्व:ताच्या फायद्यासाठी अपहार केला.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून कल्पनाबाई जिजाबराव पाटील (50, सरपंच), नंदकिशोर चिंधु सांगोरे (48, उपसरपंच), करुणा रामकृष्ण ईधाटे (35, घरकाम), मालती भागवत पाटील (36, सदस्या), आशाबाई नाना भील (51, सदस्या), साहेबराव छगन पाटील (68, सदस्य), संगीताबाई छगन पाटील (42, सदस्या), शांताराम आर पाटील (58, तत्कालीन ग्रामसेवक, सर्व रा.मजरेहिंगोणा, ता.चोपडा जि.जळगाव) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 406, 420, 464, 468,427, 477 (-), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शामकांत बोरसे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e