रेशन कार्डचा उपयोग फक्त स्वस्त भावात रेशन घेण्यासाठीच होतो असा नाही तर शिधापत्रिका ही विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील आवश्यक असते. हे एक महत्त्वाचे शासकीय कागदपत्र आहे. मात्र नवीन रेशन कार्ड बनवताना नागरिकांना अनेकदा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
अनेकांच्या माध्यमातून रेशन कार्ड दुकानदार त्यांना नवीन रेशन कार्ड बनवून देत नसल्याच्या तक्रारी केल्या जातात. जर तुमचाही रेशन दुकानदार तुम्हाला नवीन रेशन कार्ड बनवून देत नसेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की, आता रेशन कार्डसाठी घरबसल्या आणि मोबाईल मधून अर्ज करता येणार आहे.
यामुळे आज आपण घरबसल्या नवीन Ration कार्डसाठी कसा अर्ज करावा याबाबत जाणून घेणार आहोत. शासनाने आता नागरिकांना नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता राज्यातील नागरिक रेशन कार्डसाठी ऑनलाईन Apply करू शकणार आहेत. यामुळे आता आपण रेशन कार्डसाठी ऑनलाईन कसा अर्ज करायचा, कोणत्या वेबसाईटवर यासाठी अर्ज सादर करावा लागतो याविषयी जाणून घेणार आहोत
कसा करणार ऑनलाइन अर्ज
जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला यासाठी राज्य शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. www.mahafood.org.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन हे ऑप्शन दिसेल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागणार आहे.
यासाठी तुम्हाला रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर मग तुम्हाला साइन-अप हिअर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर मग तुम्हाला अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर मग तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म उघडेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
हा फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. जर तुम्ही सादर केलेली माहिती यथायोग्य असेल तर काही दिवसानंतर तुमचे रेशन कार्ड मंजूर होईल. यानंतर तुम्हाला रेशन कार्ड मंजूर झाल्याबाबतचा मेसेज देखील मिळेल. तुम्हाला एकदा की हा मेसेज मिळाला की तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयातून किंवा मग तुमच्या रेशन दुकानदाराकडून तुमचे नवीन रेशन कार्ड प्राप्त करू शकणार आहात.
0 Comments