नाशिक: भेसळीच्या संशयावरुन मिरची, धने पावडर साठा जप्त

दीपावलीच्या पार्श्वभूमिवर अन्न व औषध प्रशासनातर्फे सातपूर येथील नारंग कोल्ड स्टोरेज येथे छापा टाकून भेसळीच्या संशयावरुन १६ लाख रुपयांची मिरची आणि दोन लाख रुपयांची धने पावडर जप्त केली आहे.
नाशिक – दीपावलीच्या पार्श्वभूमिवर अन्न व औषध प्रशासनातर्फे सातपूर येथील नारंग कोल्ड स्टोरेज येथे छापा टाकून भेसळीच्या संशयावरुन १६ लाख रुपयांची मिरची आणि दोन लाख रुपयांची धने पावडर जप्त केली आहे.

नारंग कोल्ड स्टोरेज येथे मार्चपासून मिरची पावडर आणि धने पावडरचा साठा करण्यात आला होता. जप्त केलेल्या मिरची पावडरची किंमत १६ लाख, ६७ हजार, ८२० रुपये इतकीनारंग कोल्ड स्टोरेज येथे मार्चपासून मिरची पावडर आणि धने पावडरचा साठा करण्यात आला होता. जप्त केलेल्या मिरची पावडरची किंमत १६ लाख, ६७ हजार, ८२० रुपये इतकी आहे. जप्त केलेली धने पावडर चार हजार २७८ किलो असून किंमत दोन लाख, ३५ हजार २९० रुपये इतकी आहे. भेसळीच्या संशयावरून हा साठा जप्त करण्यात आला. व्दारका येथील मे. जे. सी. शहा ॲण्ड कंपनी या पेढीचा हा साठा असून सदर प्रकरणी घेतेले नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात येत असून अहवाल आल्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e