खंडणीचे आरोप असलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अंगडिया व्यापाऱ्यांकडून घेतलेली रक्कम हवालाद्वारे स्वीकारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेची पाच पथके उत्तर प्रदेशात गेली होती. त्यांनी तेथून त्रिपाठी यांच्या नोकराला अटक केली. आरोपीने हवाला रक्कम उत्तर प्रदेशात स्वीकारल्याचा आरोप आहे.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने लखनऊ येथे पप्पूकुमार प्यारेलाल गौड (२७) याला अटक केली आहे. गौड हा उपायुक्त त्रिपाठी यांचा नोकर असून त्याने त्रिपाठीच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्याकडून हवालाद्वारे पैसे स्वीकारले होते. न्यायालयाने गौडला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी वंगाटे याला १० मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्याने अंगडिया व्यापाऱ्यांकडून सुमारे १९ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.
0 Comments