मेघालयात करोनाकाळात ४१ माता, ८७७ बालकांचा मृत्यू

मेघालयमध्ये करोना महासाथीच्या कालावधीत गर्भवतींनी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने ४१ माता आणि ८७७ नवजात शिशूंचा मृत्यू ओढवला, अशी माहिती मेघालय सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला दिली आहे. करोनाकाळात मेघालयात गर्भवती माता आणि बाळांचे मृत्यू वाढल्याची दखल घेत आयोगाने राज्य सरकारकडे माहिती मागितली होती.  करोना महासाथीव्यतिरिक्त सामाजिक-आर्थिक प्रश्न आणि लिंगभेद यामुळेही प्रसूतीदरम्यान मातांचे आणि शिशूंचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे, असा दावा राज्य सरकारने केला आहे.   मेघालयातील अशा मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याची नोंद राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतल्यानंतर मेघालय सरकारने याबाबत कृती अहवाल आयोगाला सादर केला आहे. वैद्यकीय मदत न  मिळाल्याने यातील बहुसंख्य मृत्यू झाले आहेत. करोना चाचणी करण्यास नकार दिला जात होता, तसेच गर्भवती महिला करोना संसर्गाच्या भयाने रुग्णालयात दाखल होत नव्हत्या, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e